पालकमंत्री शिरसाट व मंत्री सावे यांच्या उपस्थितीत लोकार्पण
: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्त्वावर भाजी मंडई विकसित करण्यासाठी महापालिकेला तब्बल १४ वर्षे लागली. बुधवारी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत या भाजीमंडईचे लोकार्पण करण्यात आले. भाजीमंडईत ३५ गाळे तर १४० ओटे आहेत.
औरंगपुरा येथील जुनी भाजीमंडई पाहून त्याठिकाणी
बीओटी तत्त्वावर भाजीमंडई विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०११ मध्ये भाजीमंडईची इमारत पाडण्यात आली. जुनी भाजीमंडई पाहून त्याठिकाणी बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचे काम २०१३ मध्ये पाटील कन्स्ट्रक्शन अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरल देण्यात आले होते. लोकार्पणासाठी १४ वर्षांचा कालावधी लोटला. त्यासाठी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार बुधवारी (दि.२२) सकाळी ११
औरंगपुरा येथील भाजीमंडई १९७७मध्ये सुरू करण्यात आली होती. ही इमारती जुनी झाल्याने बीओटी तत्त्वावर विकसित झाल्यानंतर जुन्या भाजीपाला विक्रेत्यांना याच ठिकाणी जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी अनेक वर्षे अनेकांनी संघर्ष केला. पण १४० पैकी ४८ जणच मूळ ओटेधारक समोर आलेले आहेत. २० गाळे आणि उर्वरित ओटे वाटपाचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे. याठिकाणी प्रशस्त हॉलही बांधण्यात आला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












